Karhad: पालिकेच्या मासिक बैठकीला आजचा मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या मासिक बैठकीला आजचा मुहूर्त

कऱ्हाड : पालिकेच्या मासिक बैठकीला आजचा मुहूर्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : नगरपालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेला अखेर उद्या (गुरुवार) मुहूर्त मिळाला आहे. ती सभा ऑफलाइन होणार आहे. त्यात तब्बल ११८ विषयांवर सभा होणार आहे. गटनेत्यांच्या समन्वयानंतरही मासिक बैठकीला मिळेना मुहूर्त, अशा मथळ्याखाली दै. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पालिकेने सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे.

यापूर्वी अर्थसंकल्पाची सभा ऑफलाइन झाली होती. त्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी ऑफलाइन सभा होत आहे. पालिकेच्या मासिक सभा यापूर्वी ऑनलाइन होत होत्या. त्या सभा ऑफलाइन व्हाव्यात, अशी मागणी होती. ऑनलाइन सभेत होणारे विषय व त्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी गटनेत्यांनी समन्वयाने विषयांना मंजुरी द्यावी. तेच विषय सभेच्या विषय पत्रिकेवर घेतले जातील. त्या विषयावर मासिक बैठकीत चर्चा होऊन मंजुरी मिळेल, असे ठरले होते. मात्र, गटनेत्यांच्या समन्वय बैठकीनंतरही मासिक सभेला मुहूर्त मिळाला नव्हता.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

समन्वयाची बैठक पार पडली. त्यात विषय ठरलेही होते. मात्र, बैठकीला मुहूर्त मिळत नव्हता. त्याबाबत दै. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यात ‘गटनेत्यांच्या समन्वयानंतरही मासिक बैठकीला मिळेना मुहूर्त’ या मथळ्याखाली वार्तांकन केले. त्याची दखल घेऊन पालिकेने त्वरित उद्या सभेचे आयोजन केले आहे. त्या सभेतच यापूर्वी तहकूब झालेली विशेष सभाही होणार आहे. विशेष सभेत ३६, तर सर्वसाधारण सभेत ८२ अशा एकूण ११८ हून अधिक विषयांवर चर्चा होणार आहे.

loading image
go to top