esakal | महाबळेश्वरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला पेटवले

महाबळेश्वरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले

sakal_logo
By
अभिजित खुरासणे

महाबळेश्वर : चारित्र्याच्या संशयावरून राजेंद्र महादेव जाधव वय 55 रा. व्हॅलीव्हयुवरोड प्राथमिक शाळा क्र 2 च्या मागे या नराधमाने आज सकाळी आपल्या पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकुन तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पत्नीला पेटवुन नराधम पळुन गेला असुन महाबळेश्वर पोलिस या नराधामाचा शोध घेत आहेत. दरम्यान घटना स्थळास आज उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. शितल जान्हवे कराडे यांनी भेट दिली. महाबळेश्वर पोलीस नराधम पतीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा: सातारा : लाच प्रकरणी वरकुटे-म्हसवडचा तलाठी जाळ्यात

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका भयंकर घटनेने आज महाबळेश्वर हादरले. प्राथमिक शाळा क्र 2 च्या इमारतीच्या मागे एका चाळीत वेण्णालेेक येथे घोडे व्यवसाय करणारा राजेंद्र महादेव जाधव हा आपली पत्नी बायना, प्रकाश, श्रीकांत व सचिन ही तीन मुले व एक मुलगी विदया असे एकत्र राहतात. राजेंद्र हा दारूडया असुन तो रोज आपल्या पत्नीच्या चारीत्रावर संशय घेत असतो. या वरून पती पत्नी मध्ये वारंवार भांडणे होत असतात. आज सकाळी पती घरी नसताना पावणे आठच्या दरम्यान पत्नी नैसर्गिक विधीसाठी गेली होेती. त्या वेळी पती हा घरी आला. त्याने पाहीले पत्नी घरात नाही व सर्व मुले ही झोपली आहेत. त्या वेळी या नराधमाने आपल्या चाळीतील घराला बाहेरून कुलूप लावले.

हेही वाचा: शुद्ध पाण्यासाठी महिलांचा कोयना प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

घराशेजारी असलेल्या एका गल्लीत तो आपल्या पत्नीची वाट पहात होता. त्या वेळी त्याच्या हातात प्लास्टिकचा एक मग होता. पत्नी शौचालयावरून घरी निघाली तेव्हा आपले पती हे रस्त्यात उभे असलेले तीने पाहीले. पत्नी जवळ येताच राजेंद्र जाधव याने आपल्या हातातील मग मध्ये असलेले ज्वलनशील पदार्थ हे पत्नीच्या अंगावर टाकले. ज्वलनशील पदार्थ टाकत असताना तो शिवीगाळ करून तुला आज मारून टाकतो असे बोलत होता. शिवीगाळ करीतच त्यांने पत्नीच्या अंगावरील साडीला आग लावली. ज्वलनशील पदार्था मुळे आग तात्काळ भडकली व पत्नीला आगीने वेढले. पतीने पेटवुन देताच पत्नीने टाहो फोडला व आरडा ओरडा सुरू केला.

पत्नीने आरडा ओरडा केल्याने नराधम पतीने घटना स्थळावरून पळ काढला. इकडे महीलेच्या किंकाळया आणि आरडा ओरडा ऐकुन चाळीतील लोक धावतच बाहेर आले. बाहेरील गल्लीतील दृश्य पाहुन चाळीतील लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. क्षणभर त्यांना काय होतेय तेच समजले नाही. या वेळी सचिन सपकाळ व श्रीनिवास धनपत व इतरांनी समय सुचकता दाखवित महीलेच्या अंगावर पाणी टाकुन आग विझविली.

हेही वाचा: साताऱ्यात मुलाची तणावातून आत्महत्या; निरीक्षण गृहातील कारभाऱ्यांना ‘क्लीन चीट’

दरम्यान आपल्या आईच्या किंकाळया आणि आरडा ओरडा ऐकुन तिची मुले जागी झाली. पंरतु घराला नराधम पतीने कुलुप लावले होते. कसेतरी मुले बाहेर पडली तेव्हा आई भाजल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांनी आपल्या आईला येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी बायना जाधव यांना सातारा येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची खबर समजतात वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. शितल जान्हवे कराडे यांनी आज दुपारी घटना स्थळाला भेट देवुन पाहणी केली. तसेच या घटनेच्या तपासा बाबत महाबळेश्वर पोलिसांना मागर्दशर्न केले.

हेही वाचा: ‘किसन वीर’ ची निवडणूक लढवू : आमदार पाटील

फाॅरेन्सिक एक्स्पर्ट व ठसे तज्ञ यांनी घटना स्थळाला भेट देवुन महात्वाची माहीती गोळा केली. पोलिसांनी घटना स्थळावरून काही नमुने देखिल गोळा केले आहेत. पत्नी पेटत्या अवस्थेत पळत असताना त्यांच्या गळयातील मंगळसुत्र एका ठिकाणी पडले होते. ते सुध्दा आज पोलिसांनी हस्तगत केले आहे. संशयित आरोपी राजेंद्र जाधव याचेवर महाबळेश्वर पोलिसांनी भा.द.वी 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घटना स्थळावरून पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके तयार करून ती पथके फरार आरोपिच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याचा कसुन शोध घेत आहेत. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास पांचगणीचे सहा. पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मागर्दशर्ना खाली सहा. पोलिस निरीक्षक अब्दुल बिद्रि, पोलिस कर्मचारी श्रीकांत कांबळे हे करीत आहेत.

loading image
go to top