

Satara District Pride Lieutenant Aditi Dhigare Leads Naval Honour Guard for Vice President CP Radhakrishnan at Karwar Naval Base
sakal
कऱ्हाड : भारतीय नौदलात आपल्या नेतृत्वगुणांची छाप उमटवत येथील कन्येने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. सैदापूरमधील रेणुकानगर (ता. कऱ्हाड) येथील लेफ्टनंट आदिती ढिगारे यांनी कर्नाटकातील कारवार नौदल तळावर झालेल्या ‘आयएनएस समर्थक’ जहाजाच्या कमिशनिंग सोहळ्यात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आलेल्या औपचारिक मानवंदना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान मिळवला.