कऱ्हाड : ओबीसींचे कऱ्हाडला ‘जवाब दो’ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसींचे कऱ्हाडला ‘जवाब दो’ आंदोलन

कऱ्हाड : ओबीसींचे कऱ्हाडला ‘जवाब दो’ आंदोलन

कऱ्हाड : ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चाद्वारे निषेध नोंदविण्यात आला. या वेळी ओबीसा समाजाने ‘जवाब दो’ आंदोलन केले. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे अनेकांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. या वेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आंदोलन करण्‍यात आले.

त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा नेण्‍यात आला. जोपर्यंत ओबीसी समाजाची जनगणना होत नाही, तोपर्यंत आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरूच ठेवण्याचा निर्धार आजच्या ‘जवाब दो’ आंदोलनाद्वारे घेण्यात आला. राजकीय आरक्षण न मिळाल्यास ओबीसींनी निवडणुका लढवू नयेत, अशी आग्रही भूमिका वक्त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी व अन्य १० मागण्यांबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विरोधी पक्षासह पदाधिकाऱ्यांनाही उत्तर देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, भानुदास यांच्या मार्गदर्शनात आंदोलन झाले.

संघटनेचे महासचिव क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटक संजय परदेशी, बारा बलुतेदार महासंघ जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, राजेंद्र भादुले, नीळकंठ म्हेत्रे, निळकंठ उमरदंड, नंदकुमार गुरव, अंजली कुंभार, नथुराम कुंभार, विजय मुठेकर, मज्जीद आंबेकरी, शशिराज करपे, अक्षय गवळी, रवींद्र मुंढेर, उदय हिंगमिरे, आनंदराव कोळी, गणेश हिंगमिरे, अशोक संसुद्दी, राजाराम सोनवणे, जुबेदार अहमद, नवाज सुतार, सोपान तावरे, संजय ठिगळे, ओंकार मुळे, अतुल पाडळे, वैभव हिंगमिरे, नंदकुमार बटाणे, विनायक गायकवाड, संभाजी काशिद, अनिल हिंगे, संदीप मुंढेकर, भानुदास जयीनगडे उपस्थित होते.

Web Title: Karhad Obc Reservations Answer Movement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top