Satara News : पंतप्रधानांच्या मन की बातमध्ये कऱ्हाडकर; ९९ व्या कार्यक्रमात कऱ्हाडला थेट लाईव्ह येण्याची मिळाली संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 99 व्या मन की बात कार्यक्रम
Karhad PM Mann Ki Baat 99th event Karhad got chance to come live satara
Karhad PM Mann Ki Baat 99th event Karhad got chance to come live satarasakal

कऱ्हाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 99 व्या मन की बात कार्यक्रमात महाराष्ट्रातुन फक्त सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड (जि.सातारा) येथील पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसह अधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांना थेट लाईव्ह कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होण्याची संधी मिळाली.

पंतप्रधान मोदी यांनी आजच्या देशाला उद्देशुन मन की बातमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या सोबत मृत्यूनंतर मानवी अवयव दान ही काळाची गरज असून त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळणार आहे असे सांगितले.

त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या वापराबद्दल सखोल माहिती देवुन वंदे भारतची देशातील पहिली महाराष्ट्रातील महिला लोको पायलट यादव यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचे नामोल्लेख करुन अभिनंदन केले.

Karhad PM Mann Ki Baat 99th event Karhad got chance to come live satara
Satara News: शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करा

त्या कार्यक्रमात महाराष्ट्रातुन फक्त सातारा जिल्ह्यातील येथील पालिकेतील कर्मचारी, अधिकारी, आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना थेट लाईव्ह सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी अतुल भोसले,

भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, रफीक भालदार, डॉ. अनिल शहा, डॉ. हेमंत जानुगडे, डॉ नचिकेत वाचासुंदर, उद्योजक दीपक अरबुणे, कांतीलाल जैन, घनश्याम पेंढारकर, सुहास जगताप, उद्योजक मुकुंद चरेगावकर, रुपेश मुळे, सुनील शिंदे, शंकर पाटील, प्रमोद शिंदे,

प्रशांत कुलकर्णी, नितीन शहा, विवेक भोसले, विशाल कुलकर्णी, सौरभ शहा, सुनील नाकोड, उमेश शिंदे, शैलेश गोंदकर, विश्वनाथ फुटाणे, विनायक घेवदे, सुहास चक्के, रुपेंद्र कदम, किरण गुजले, संजय घाडगे, श्री. खवळे, संतोष कांबळे, युवराज भोसले, अभीजित खवळे, श्रीमती आठवले, सीमा धार्गे, सारिका गावडे, धनश्री रोकडे, जनाबाई जाधव, मंजिरी कुलकर्णी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com