कऱ्हाडला सामुदायिक आत्मदहनाच्या आदल्या दिवशी मिटले उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 hunger strike

कऱ्हाडला सामुदायिक आत्मदहनाच्या आदल्या दिवशी मिटले उपोषण

कऱ्हाड : कऱ्हाड येथील पालिकेच्या अनुकंपा प्रतिक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रतिक्षा अखेर आज संपली. तब्बल 18 वर्षामनंतर अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे त्यासाठी सुरू असलेले बेमुदत आंदोलन आज मागे घेण्यात आले. त्यासाठी लोकशाही आघाडीने पाठपुराव्यासह केलेल्या मध्यस्थीमुळे प्रश्न मार्गा लागला. लोकाशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, जयंत बेडेकर यांच्या हस्ते सरबत घेवून कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील, जयंत पाटील, सौरभ पाटील यांनी पुढाकार घेवून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल कर्मचाऱ्यांची त्यांचे आभारही मानले.

जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी २०२१ च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करावी, यास मंजूरी दिली. त्यानुसार फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड पालिकेतील कर्मचाऱ्यांची ३१ मार्च २०२२ रोजी सातारा येथे ऑर्डर देण्यात आली. मात्र कऱ्हाडमधील अनुकंपा तत्वारील कर्मचाऱ्यांची ऑर्डर अद्याप काढलेली नाही. १५ ते १८ वर्षापासुन अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळेल याच अपेक्षेने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र तरिही त्यांचे काम मार्गी लागले नाही. त्यांबाबत त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, लोकशाहीचे नेते सुभाष पाटील यांच्याकडे पाठपुरावा केलाय नियुक्तीला विलंबामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

तीन दिवसात काही निर्णय घेवून ऑर्डर दिली नाही तर 14 एप्रिलला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र आज तो प्रश्न निकाली काढला आहे. त्यासाठी लोकशाही आघाडीच्या सौरभ पाटील मुख्याधिकारी डाके यांनी समन्वयातून तोडगा काढला आहे. आत्तापर्यंत निवृत्त झालेल्यांच्या जागी नियुक्ती होईल. अनुकंपावरील ३५ पैकी किंमान २२ कर्मचाऱ्यांना तसे आदेश सोमवारी देण्यात येतील.

त्याची कायदेशीर पुर्तता करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डाके यांनी दिली. त्यावेळी उपोषणकर्त्यांना टाळ्यांचा गरज केला. लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी अनुकंपा तत्वारील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत लोकशाही आघाडीने पाठपुरावा केला आहे. त्यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही ठोसपणे निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्याबरोबर सुभाष पाटील, जयंत पाटील यानीही त्यात मार्गदर्शन केल्याने एकजुटीनने प्रश्न मार्गी लावण्यात यश आले

Web Title: Karhad Went Hunger Strike Before Community Self Immolation Issue Compassionate Employees Resolved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top