
सातारा : सातारकरांची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, गुरुवार शुक्रवार पासून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कास तलाव परिसरात चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अखेर कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.