कास - बामणोली रस्त्यावरील पूलाचे काम लवकरच : उदयनराजे

गिरीश चव्हाण
Friday, 23 October 2020

यासाठीच्या 50 लाख रुपयांचा निधी नुकताच पालिकेने बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सातारा : कास धरणाच्या कामामुळे बाधित झालेल्या कास- बामणोली रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी आवश्‍यक असणारा 50 लाखांचा निधी सातारा नगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यालयाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
 
पत्रकात म्हटले आहे, की सातारा शहराचा होणारा विस्तार आणि वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करत कास धरणाची उंची वाढविण्याबरोबरच इतर पाणीपुरवठा सुविधांना बळकटी करण्यासाठी प्रस्ताव खासदार उदयनराजे यांनी शासनाकडे सादर केला होता. हे काम पूर्ण झाल्यास 2040 पर्यंतचा पाणीप्रश्‍न निकाली निघणार असल्याने त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा उदयनराजेंनी सुरू ठेवला होता. यामुळेच शासनाने त्यास मंजुरी देत आवश्‍यक निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून धरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठीचा निधी शासनाने दिला आहे. या निधीतून येत्या आठ दिवसांत उर्वरित कामाला सुरुवात होणार आहे.

उदयनराजेंच्या सातारा विकासला भाजपचा ठेंगा!
 
धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर त्या परिसरातून बामणोलीकडे जाणारा मार्ग पाण्याखाली जाणार आहे. यामुळे याठिकाणी पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठीच्या 50 लाख रुपयांचा निधी नुकताच पालिकेने बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kass Dam Work Will Begin Within Eight Days Says MP Udayanraje Bhosale Satara News