सहकारी संस्थांनी विरोधकांच्या भूमिकेला बळी पडू नये : केशव उपाध्ये

भद्रेश भाटे
Monday, 22 February 2021

सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाची माहिती व्हावी, यासाठी वाई शहर भाजपतर्फे आयोजित अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात केशव उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले.

वाई (जि. सातारा) : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांकडून सर्वसामान्य जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवले जात असून, उद्योजक, व्यापारी, शेतकरी व सहकारी संस्थांनी विरोधकांच्या या सरकारविरोधी भूमिकेला बळी पडू नये. अर्थसंकल्पाविषयी विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेशचे प्रमुख प्रवक्‍ते केशव उपाध्ये यांनी येथे केले.
 
सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्पाची माहिती व्हावी, यासाठी वाई शहर भाजपतर्फे आयोजित अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कर सल्लागार ऍड. प्रभाकर सोनपाटकी होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, अविनाश फरांदे उपस्थित होते. या वेळी श्री. उपाध्ये आणि ऍड. सोनपाटकी यांनी सोप्या व सुलभ शब्दांमध्ये अर्थसंकल्पातील सर्व बाबी मांडल्या. 

शहराध्यक्ष राकेश फुले यांनी प्रास्ताविक केले. देवानंद शेलार यांनी परिचय करून दिला. तनुजा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा घैसास यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजप सहकार आघाडीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक, अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी शहरातील व्यापारी, उद्योजक, तसेच वेगवेगळ्या बॅंकांमधील प्रमुख कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मोदीजी, 70 वर्षांत कॉंग्रेसनं काहीच नाही केलं; मग तुम्ही 7 वर्षांत काय केलं?; माजी मुख्यमंत्र्यांचा टोला

अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करा; आमदार शिंदेंचे प्रशासनाला सक्त आदेश

कोयनेला जागतिक पर्यटन केंद्र बनविणार; मुख्य अभियंता हणमंत गुणालेंची ग्वाही

लोकशाहीचे नव्हे, तर हे ठोकशाहीचे राज्य; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

सातारकरांनाे! लॉकडाउन टाळणे आपल्याच हाती; अशी घ्या काळजी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keshav Upadhyay Budget 2021 Wai Satara Marathi news