Khambatki Ghat Accident
esakal
खंडाळा : सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Satara–Pune Highway) खंबाटकी घाटात (Khambataki Ghat) शुक्रवारी (ता. २६) सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. घाटातील एका हॉटेलजवळ उलट्या दिशेने येणारा लोखंडी साहित्याने भरलेला ट्रक अचानक पलटी झाला. सुदैवाने ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.