

khambataki ghat accident
esakal
Accident News: पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. लोखंडी साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने तीन कार्सना पाठीमागून जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक चालकासह चार जण जखमी झाले आहेत. तर वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.