Khambatki Ghat traffic jam today
esakal
खंडाळा : सातारा-पुणे महामार्गावरील महत्त्वाचा मार्ग असलेल्या खंबाटकी घाटात आज (शनिवार, ता. १४) सकाळपासून वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. घाटातील दत्त मंदिराजवळ एक ट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत (Pune Satara highway traffic update today) आहे.