Khambatki Ghat Traffic
दिवाळी सुट्टीमुळे खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
वाहनांची लांबलचक रांग लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पथके तैनात केली आहेत.
Heavy Traffic Jam at Khambatki Ghat : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने राज्यभरातील महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच दरम्यान सातारा-पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटात शनिवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीमुळे हजारो वाहनचालक आणि प्रवासी महामार्गावर अडकले असून वाहनांची लांबलचक रांग लागली आहे.