
खंडाळा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये आज रविवारी वीकएंडला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑइल टँकरची गळती होऊन रस्त्यावरच ऑइल सांडले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.