
खंडाळा येथील न्यायालयात हजर केले असता संशयितांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
लोणंद (जि. सातारा) : बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) येथील युवक सूरज बापूराव धायगुडे याच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी येथील 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना नुकतीच अटक केली. दरम्यान, खंडाळा येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
संशयितांपैकी एकाच्या पत्नीस मेसेज का करतो, या कारणावरून चिडून जावून येथील मंगेश उत्तम क्षीरसागर (वय 39), राजेश उत्तम क्षीरसागर (वय 36), योगेश बाळासाहेब कांबळे (वय 34) (तिघेही रा. फुलेनगर, लोणंद), रोहित रवींद्र धनवडे (वय 30) रा. लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे, लोणंद, सूरज राजेंद्र डोंबाळे (वय 25) मैत्री पार्क निंबाळकर हॉस्पिटलजवळ, लोणंद, राकेश भारत माने (वय 28) रा. शास्त्री चौक, लोणंद, प्रथमेश प्रकाश भोसले (वय 20) रा. गोटमाळ, लोणंद, सुरेश रामा पवार (वय 40) रा. गोटमाळ, लोणंद, धीरज प्रकाश जायमाळी (वय 25) रा. सावित्रीनगर गोटेमाळ, लोणंद, अक्षय सतीश क्षीरसागर (वय 26) रा. लोणंद व गणेश अशोक भालेराव (वय 28) रा. लोणंद यांनी बाळूपाटलाचीवाडी (ता.खंडाळा) येथील सूरज बापूराव धायगुडे (वय 23) यास संगनमताने समाधान ढाब्यासमोर लाकडी दांडक्याने मारहाण करून लोणंद बस स्थानकासमोर आणून टाकले.
पहाटे सूरज यास नातेवाईकांनी उपचारासाठी पुणे येथे नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सूरज धायगुडे याचे चुलते राघू धायगुडे यांनी याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवल्यावर लोणंद पोलिसांनी या 11 जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, या सर्वांना खंडाळा न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
पदाधिकारी, नगरसेवकांचे प्रभाग झाले आरक्षित; महिलांसाठी नऊ जागा राखीव
एका सिगारेटने केले कोटीचे नुकसान; साताऱ्यात पाच शिवशाही जळून खाक
शासन अनुदानातून बांबूची लागवड करा; भाजपच्या पटेलांचे शेतकऱ्यांना आवाहन
शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत, लागलेच तर त्याचा नाद संपवल्याशिवाय गप्प बसत नाहीत
जंगलाची काळजी घ्या; अन्यथा होणार पाच वर्षे शिक्षा, पंचवीस हजार दंड
Edited By : Siddharth Latkar