

Speeding Truck Crashes Into Vehicles on Satara–Pune Road
Esakal
खंडाळा . ता . ७ : सातारा पुणे महामार्गाववर एका ट्रकनं सहा चारचाकी गाड्यांना धडक दिल्याची घटना घडलीय. खंबाटकी घाटातील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ही घटना घडली. खंबाटकी घाटातल्या बोगद्यानंतर येणाऱ्या एस आकाराच्या वळणावर भरधाव ट्रकनं सात वाहनांना धडक दिली. यात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसंच कुणाला गंभीर दुखापत झालेली नाही.