खंडाळ्यातील 18 सप्टेंबरपर्यंतचा बंद मागे

अशपाक पटेल
Monday, 14 September 2020

शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार बंद मागे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
 

खंडाळा (जि.सातारा) : खंडाळा शहर व्यापारी असोसिएशनने उत्स्फूर्तपणे पुकारलेल्या आठ दिवसांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याने व खंडाळ्यातील विशेषतः शिवाजी चौक परिसरातील दुकाने बंद काळातही सुरूच असल्याने अखेर बंद मागे घेण्यात आला. मात्र, असोसिएशनच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार हा बंद माघारी घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

त्यामुळे आजपासून (साेमवार, ता. 14) येथील सर्व बाजारपेठ पुन्हा पूर्ववत खुली करण्यात येणार आहे. शहर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीनुसार दहा ते 18 सप्टेंबरपर्यंत कडक लॉकडाउन पाळण्याचे व शहरातील सर्व बाजारपेठ बंद करून जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले. नागरिकांची सोय म्हणून चार दिवसांनंतर बंदमध्ये ब्रेक म्हणून एक दिवस ठरविण्यात आला.

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार! 

इतरही नियमावली ठरविण्यात आली. मात्र, मध्येच ब्रेक असलेल्या या बाजारपेठ बंदमध्ये काही दुकाने सुरूच असल्याने बंदला चार दिवसांनी ब्रेक घ्यावा लागला आहे. शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने नागरिकांच्या मागणीनुसार बंद मागे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

साताऱ्याच्या राजघराण्यातील स्नुषा चंद्रलेखाराजे भोसले यांचे निधन आज (सोमवार) सकाळी नऊला अंत्यसंस्कार

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandala Market Reopen From Monday Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: