Lockdown Rules : खंडाळ्यात पोलिसांची धडक कारवाई; 189 जणांवर गुन्हा

Khandala Police
Khandala Policeesakal

खंडाळा (सातारा) : येथील पोलिसांनी लॉकडाउन नियमांचा (Lockdown Rules) भंग केल्याप्रकरणी एका आठवड्यात 189 जणांवर कारवाई करत 63 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. यामुळे येथील नागरिक घराबाहेर पडताना विचार करू लागले आहेत. पोलिस निरीक्षक महेश इंगळे (Police Inspector Mahesh Ingle) यांच्या नेतृत्वाखाली आपला कडक पहारा ठेवला असल्याचे चित्र आहे. (Khandala Police Take Action Against 189 Citizens For Violating Lockdown Rules Satara News)

Summary

खंडाळ्यात लॉकडाउन नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आठवड्यात 189 जणांवर कारवाई करत दंड वसूल केला आहे.

येथे शिवाजी चौकासह इतर ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे, तर परिसरातील गावातही पोलिस फिरू लागल्याने नागरिकही कडक लॉकडाउन नियम पाळत आहे. मात्र, यातून काही जण बिनदिक्तपणे फिरताना आढळत असल्याने पोलिसांनी (Police) यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उभारला आहे. येथील पोलिसांनी एका आठवड्यात विनामास्क फिरणार या 92 जणांवर कारवाई करत 18 हजार 400 रुपये, सोशल डिस्टन्ससंदर्भात (Social Distancing) दोघावंर कारवाई करत दोन हजार रुपये, तर विनाकारण फिरणार या एकूण 80 जणांवर कारवाई करत 40 हजार रुपये दंड वसूल केला, तर सकाळपासून 12 मोटरवाहनांवर कारवाई करत दोन हजार 400 रुपये वसूल केला आहे. वाहन डिटेन व आस्थापना संदर्भात खंडाळा पोलिसांनी ही कारवाई केलीय. खंडाळ्यातील शिवाजी चौकात नाकाबंदी करून तीन तासांतच सात हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Khandala Police Take Action Against 189 Citizens For Violating Lockdown Rules Satara News

Khandala Police
कार्यमुक्त BAMS डॉक्‍टरांना सेवेत घ्या; खासदार श्रीनिवास पाटलांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com