esakal | उरमोडीचे पाणी खटावला द्या अन्यथा आंदोलनास सामाेरे जा; प्रशासनाला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

उरमोडीचे पाणी खटावला द्या अन्यथा आंदोलनास सामाेरे जा; प्रशासनाला इशारा

सध्या तालुक्‍यातील शेतकरी आणि जनेतसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे.

उरमोडीचे पाणी खटावला द्या अन्यथा आंदोलनास सामाेरे जा; प्रशासनाला इशारा

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्‍यात सोडावे, अशी मागणी नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी माजी सभापती संदीप मांडवे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय शिंदे, मधुकर मोहिते, शिवसेनेचे आबासाहेब भोसले, सुशांत पार्लेकर आदी उपस्थित होते.

सध्या तालुक्‍यातील शेतकरी आणि जनेतसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या प्रसंगी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा विजय शिंदे यांनी दिला. 

कोरोना चाचणी केल्यासच कऱ्हाड पालिकेत प्रवेश; मुख्याधिकारी डाकेंचा सक्त आदेश

वाढेतील हॉटेलवर सातारा पोलिसांचा छापा; जुगार खेळणाऱ्या सात बड्या व्यापाऱ्यांना अटक

साताऱ्यात पोलिसांची गुटख्यावर धडक कारवाई; हिरा पान, रॉयल तंबाखूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सलग चौथ्या दिवशी उद्रेक! साताऱ्यात कोरोनाचा रेकाॅर्ड ब्रेक उच्चांक; 24 तासात 758 जण पाॅझिटिव्ह

Edited By : Siddharth Latkar

loading image