esakal | राजकीय दृष्टिकोनातून खटाव तालुक्‍याला महत्व; 90 ग्रामपंचयातींत हाेणार निवडणुक
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय दृष्टिकोनातून खटाव तालुक्‍याला महत्व; 90 ग्रामपंचयातींत हाेणार निवडणुक

पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यात पुढारी यशस्वी झाले आहेत.

राजकीय दृष्टिकोनातून खटाव तालुक्‍याला महत्व; 90 ग्रामपंचयातींत हाेणार निवडणुक

sakal_logo
By
अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील मुदत संपलेल्या 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुकाचा बिगूल वाजला आहे. राजकीयदृष्ट्या तालुक्‍यातील महत्त्वाच्या निमसोड, कलेढोण, पुसेगाव, पुसेसावळी, चितळी या ग्रामपंचायती कोणाच्या ताब्यात जाणार याकडे लक्ष आहे. निवडणुकीचा अंदाज आल्याने उमेदवारांची चाचपणी अगोदरपासूनच पुढाऱ्यांनी केली आहे.
 
खटाव तालुका हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. नुकत्याच झालेल्या पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यात पुढारी यशस्वी झाले आहेत. तालुक्‍यातील निमसोड, कलेढोण, पुसेगाव, पुसेसावळी, चितळी येथील प्रमुख ग्रामपंचायती काबीज करण्यासाठी नेते आग्रही असतात.

जयंत पाटलांचे आश्वासन बोलाची कढी, बोलाचाच भात ठरले; 'जलसंपदा'त कुरबुर 

निवडणूक होणाऱ्या खटाव तालुक्‍यातील ग्रामपंचायती : निमसोड, पुसेगाव, कलेढोण, अंबवडे, गुरसाळे, कातरखटाव, एनकुळ, पुसेसावळी, गोरेगाव, पारगाव, उंचीठाणे, मांडवे, तडवळे, वडगाव, नागाचे कुमठे, वरुड, पेडगाव, सातेवाडी, हिंगणे, उंबर्डे, चितळी, पाचवड, हिवरवाडी, कान्हरवाडी, बोंबाळे, डाळमोडी, धोंडेवाडी, गोपूज, नायकाचीवाडी, वडी, लांडेवाडी, नांदोशी, जायगाव, गणेशवाडी, येरळवाडी, बनपुरी, सूर्याचीवाडी, डांभेवाडी, दातेवाडी, खातगुण, दरूज, कोकराळे, भोसरे, अंभेरी, लोणी, नढवळ.

Good News : सोने ५० हजारांच्या खाली; पाच हजारांनी वधारण्याची शक्यता कायम

याबराेबरच मुळीकवाडी, निढळ, चोराडे, कणसेवाडी, मानेवाडी- तुपेवाडी, गुंडेवाडी, पिंपरी, ढोकळवाडी, कानकात्रे, गारळेवाडी, तरसवाडी, अनफळे, गारुडी, विखळे, रहाटणी, वांझोळी, लाडेगाव, शेनवडी, पुनवडी, रेवली, कळंबी, खबालवाडी, खरशिंगे, येळीव, वाकेश्वर, कारंडेवाडी, धारपुडी, जांब, गादेवाडी, जाखणगाव, गारवडी, भुरकवडी, चिंचणी, मांजरवाडी, मोळ, वेटणे, रणसिंगवाडी, राजापूर, नेर, खातगुण ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शेखर गोरे, प्रभाकर देशमुख यांची भूमिका ठरणार निर्णायक

Edited By : Siddharth Latkar

loading image