esakal | भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी I West Bengal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Das

महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेकांनी राष्ट्रवादी, काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत पक्षाला रामराम ठोकला होता.

भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

कोलकता : महाराष्ट्रातील युती सरकारच्या काळात भाजपमध्ये प्रवेशासाठी अनेकांनी राष्ट्रवादी, काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, राज्यात राजकीय चित्र पलटताच अनेक दिग्गज नेत्यांनी पुन्हा 'घरवापसी' करत आपल्या स्वगृही परतनं पसंत केलं आणि भाजपला 'जय महाराष्ट्र' केला. अशीच स्थिती सध्या पश्चिम बंगालमध्ये पहायला मिळतेय. मागील काही महिन्यांपासून भाजपमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांची रांग लागलीय. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आतापर्यंत पाच आमदारांनी पक्ष सोडला असून मंगळवारी त्रिपुरातील (Tripura) एका आमदारानं चक्क मुंडण करत पक्षाला रामराम ठोकलाय. लवकरच ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात दाखल होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या आमदाराच्या प्रतापाने भाजप तोंडघशी पडलीय, असंच म्हणावं लागेल.

पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत (West Bengal Assembly by Election) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा दोन दिवसांपूर्वी विक्रमी मतांनी विजय झालाय. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून (Nandigram) भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांच्याविरोधात ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता स्थापन झालीय. अशावेळी ममता बॅनर्जी यांच्यासाठी आमदार शोभनदेव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवलाय. त्यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केलाय. या विजयामुळे तृणमूल काँग्रेसला 'अच्छे दिन' आल्याने अनेकांनी तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची भूमिका जाहीर केलीय. यात भाजप नेत्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा: एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'

गेली अनेक वर्ष भाजपसोबत (BJP) असलेले नेते व आमदार आशिष दास (Ashish Das) यांनी मंगळवारी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा केली. ते सुरमा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मंगळवारी कोलकाता येथील प्रसिध्द कालिघाट मंदिरात जाऊन यज्ञ केला. तसेच तिथे मुंडणही केले. हे मंदिर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराजवळच आहे. पक्ष सोडताना दास यांनी, भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता पसरलीय. राज्य सरकारच्या कामगिरीवर लोक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळंच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दासांनी सांगितले. तसेच दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. काही महिन्यांपूर्वी ममता बॅनर्जी यांना भावी पंतप्रधानही दास यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे : अजित पवार

loading image
go to top