Political News : 'किसन वीर'चा बिगुल वाजला; NCP आमदाराचं पॅनेल निवडणूक रिंगणात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makrand Patil

मागील महिन्यात कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्यात आलीय.

'किसन वीर'चा बिगुल वाजला; NCP आमदाराचं पॅनेल निवडणूक रिंगणात?

सातारा : किसन वीर साखर कारखान्याचा निवडणूक (Kisan Veer Sugar Factory Election) कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या सोमवार (ता. २८) पासून अर्ज दाखल करता येणार आहेत. तीन मे रोजी मतदान होणार असून, ५ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळ तसेच आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांचे पॅनेल असणार का, याची उत्सुकता आहे.

भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. तरीही सहकार निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मागील महिन्यात कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. त्यातच सध्या कामगारांनी आपला थकीत पगार मिळावा म्हणून आंदोलन केले होते. कारखान्याच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी निवडणूक कार्यक्रम अंतिम केलाय.

हेही वाचा: 'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली

यामध्ये सोमवारपासून (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ता. ४ एप्रिलला दाखल अर्जांची छाननी होईल. तेथून पुढे १५ दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानुसार ता. १९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. तीन मे रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. ५ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मदन भोसले भाजपकडून पॅनेल टाकणार काय आणि आमदार मकरंद पाटील यांचे पॅनेल असणार काय, याकडे पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Kisan Veer Sugar Factory Announces Election Program

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..