कुत्र्याला जेवण न दिल्याने वेटरवर चाकूने हल्ला; सांगलीच्या एकावर गुन्हा

Dog
Dogesakal
Updated on
Summary

सोबत आणलेल्या कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिल्याने वेटरवर चाकू हल्ला झाला.

वहागाव : सोबत आणलेल्या कुत्र्याला (Dog) जेवण देण्यास नकार दिल्याने वेटरवर चाकू हल्ला झाला. येथील राजधानी ढाब्यावर काल रात्री उशिरा प्रकार घडला. त्याप्रकरणी तळबीड पोलिसात (Talbeed Police) गुन्हा दाखल आहे. रूपेश बावधनकर (रा. सांगली) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. संजय नाटेकर (वय ३२, रा. मार्केटयार्ड, कऱ्हाड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, काल रात्री उशिरा वहागाव येथील राजधानी ढाब्यावर रूपेश बावधनकर (Rupesh Bavdhankar) जेवायला थांबले होते. त्यावेळी संजय नाटेकर त्यांच्याजवळ गेले. त्यांनी मालकाचे कुत्र्याला जेवण देण्यास नकार दिला. त्यावेळी बावधनकरने वेटरबरोबर वाद घातला. त्याला शिवीगाळ केली.

Dog
दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक

रूपेशने हॉटेलमधील (Hotel) चाकू हातात घेऊन नाटेकरच्या गळ्याच्या बाजूला मारला. संजयच्या मानेवर जखम झाली आहे. मालक चेतन जाधव यांनी नाटेकरला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याबाबत नाटेकरने घटनेची फिर्याद पोलिसात दिली आहे.

Dog
काँग्रेसला रोखण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नाटक केलं : सोमैया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com