Satara School News : कोडोलीच्या शाळेला चढला डिजिटल साज

ग्रामपंचायत-लोकसहभागातून प्रयत्न; सर्व वर्गांत विद्यार्थ्यांना मिळू लागले डिजिटल धडे
Kodoli school gets digital equipment Gram Panchayat-efforts public participation Students started getting digital lessons
Kodoli school gets digital equipment Gram Panchayat-efforts public participation Students started getting digital lessonssakal

रेठरे बुद्रुक : गावातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कोडोली (ता. कऱ्हाड) येथे जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी लोकसहभाग व ग्रामपंचायतीचे हात एकवटले आहेत. त्यातून शाळेचे रूपडे पालटून डिजिटल साज चढला आहे.

संगणक लॅब, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही यासह शाळेच्या बाह्यांग विकासालाही गती मिळाल्याने मुलांच्या प्रगतीचा मार्ग सुकर झाला आहे.

कोडोली येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. सध्या सर्वत्रच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा बोलबाला वाढला आहे.

असे असतानाही गावातील अपवाद वगळता सर्व मुले गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात. मुळातच शाळेला भव्य इमारत आवार आणि प्रशस्त मैदान आहे. त्यामुळे पालक व मुलांना शाळा शिकण्यासाठी खुणावते; परंतु मुलांना चांगल्या दर्जाचे आधुनिक पद्धतीचे शिक्षण याच शाळेत मिळावे, यासाठी सर्वच ग्रामस्थांची एकजूट झाली.

ग्रामपंचायत सदस्यांचे धोरण व गावकऱ्यांचा सहभाग याच्या जोरावर कोणतेही चांगले काम मार्गी लागू शकते हे या गावाने दाखवून दिली आहे. त्यातून शाळेचे रूपडे पालटण्यात यश आले आहे. शाळा आधुनिक युगात सरस ठरावी, याची मुहूर्तमेढ तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रोवली. त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळू लागल्याने शाळेने वेगाने प्रगतीची पावले टाकली.

अल्पावधीत शाळेस डिजिटल यंत्रणा मिळाली आहे. या शाळेस विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी १४ व १५व्या वित्त आयोगातून नवीन पंधरा संगणक व पाच स्मार्ट टीव्ही, तसेच दोन प्रोजेक्टर दिले आहेत, तर लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून सहा संगणक, तसेच दोन एलएफटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ग्रामपंचायतीने संगीत व प्रयोगशाळा उभी केली आहे, तर अंगणवाड्यांना खेळाचे साहित्य देत शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. शाळेच्या आवारात नवीन शाळा खोल्या आणि अंगणवाडी इमारत उभारली जात आहे.

त्याचबरोबर ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली व संरक्षक भिंत उभारत शाळेच्या बाह्यांग विकासालाही हातभार लावला आहे. याचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे कोडोलीची शाळा जिल्ह्यात आदर्श होण्याकडे वाटचाल करत आहे.

ज्ञान यज्ञामध्ये समिधांची गरज

जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले आहे. त्याला शिक्षण विभागाबरोबरच त्या- त्या गावातील लोकसहभागही तितकाच कारणीभूत आहे. कोडोली गावातील ग्रामस्थ व सदस्यांनी आपले योगदान देत एक आदर्श शाळा घडवून सर्वांसाठीच एक उदाहरण निर्माण केले आहे. जिल्ह्यातील अन्य ग्रामस्थ व सदस्यांनी त्यातून बोध घेत आपल्या गावातील ज्ञानयज्ञ पेटता ठेवण्यासाठी मदतीच्या समिधा देणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com