जगभरात कोरोनाचं थैमान; ऑक्सिजन देणारी 'ही' 9 वृक्ष वाचवतील का आपला प्राण?

जगभरासह भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सिजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.
Trees
Treesesakal

सातारा : जगभरासह भारतात सध्या कोविड-19 चा कहर सुरू आहे. ऑक्सिजन कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. पृथ्वीवर ऑक्सिजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. आपण त्या झाडांविषयी जाणून घेवूयात जी सर्वात जास्त ऑक्सिजन तयार करतात.

पिंपळाचे झाड : पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साईड सोडतात. हे एकमेव असे झाड आहे जे दिवसातून पूर्ण २४ तास ऑक्सिजन देते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. तथागत गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली यामुळे याला 'बोधिवृक्ष'ही म्हणतात. या व्यतिरिक्त या झाडांची पाने औषधी गुणांनी भरलेली आहेत.

अशोकाचे झाड : अशोकाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. यांत साधा अशोक, पानांचा अशोक आणि लाल-नारिंगी फुलांचा अशोक असे प्रकार आहेत. या फुलाच्या अशोकाला सीतेचा अशोक, रक्ताशोक, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, तपनीय अशोक, सुवर्णाशोक अशीही नावे आहेत. अशोक वृक्ष संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतात. विविध प्रकारच्या आजाराला हे झाड उपयोगी असून, ते निरनिराळ्या आजाराचा नायनाट करते. सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोकाच्या झाडाचाही समावेश होतो. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करुन घर किंवा कार्यालयासमोर, विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

वडाचे झाड : वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.

बांबूचे झाड : वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ. स 2018 च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही, असे धोरण भारतीय वन कायदा 1927 च्या कलम 2 नुसार सरकारने जाहीर केले. चीन आणि आशियाच्या इतर भागात वाढणारी ‘मोसो’ (Moso) ही बांबूची जात, त्यापासून अन्य उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. ‘मोसो’ जातीचे बांबू, ७५ फूट उंचीपर्यंत वाढू शकतात. चीनमधील बांबूची शेते यामुळेच एखाद्या जंगलासारखी दिसतात. बांबूचे झाड सर्वात लवकर वाढणारे झाड आहे. बांबूचे झाड हवा फ्रेश करण्यासाठीही फायदेशीर ठरते. इतर झाडांच्या तुलनेत बांबूचे झाड ३० टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करते.

तुळशीचे झाड : तुळस ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें. मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. फुलामध्ये संगुधी तेल असते. फुलांमध्ये तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन, तर उर्वरित चार तास कार्बनडाय ऑक्साईड हवेत सोडते. प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे असते. प्रदूषणाचा स्तर साधारण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते.

कडुनिंब : लिंब हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळणारा एक वृक्ष आहे. या वृक्षाची पाने कडू असल्याने त्याला कडुनिंब म्हटले जाते. या झाडामुळे प्रदूषण होत नाही. कडुलिंब हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात. पानांच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या (oblique leaf ) सुरू होतात. कडुलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात, तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते. त्या बियांना निंबोळी किंवा लिंबोणी असे म्हणतात. या वृक्षात त्याच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काड्या सर्व काही औषधी आहेत.

उंबराचे झाड : उंबर किंवा औदुंबर हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे. यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात. हे झाड खूप मोठे असते. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराचे झाड हे हवा शुद्ध करते. तसेच या झाडाच्या सावलीत गारवा व शांतता मिळते.

निवडुंगाचे झाड : निवडुंग हा वनस्पतींचा एक प्रकार आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याची बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते, त्यामुळे कोरड्या आणि उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते. निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. आज मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण हे रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनांमुळे होत आहे. हे प्रदूषण शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी सौंदर्यीकरणासाठी सोडलेल्या जागी निवडूंग (कॅक्‍ट्स) प्रकारातील झाडे लावली पाहिजेत. या झाडामुळे कार्बनडाय ऑक्साइडचे तिथेच शोषण होण्यास मदत होईल. यामुळे तो कार्बन वातावरण दूषित होण्यास मदत करते. दिसायला काटेरी असलेले हे झाड औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ओळखले जाते.

जांभळाचे झाड : जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे, म्हणूनच भारताला जंबुद्विप असे नाव आहे. याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेत. जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे. जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. या झाडांसोबतच चिंचेचे झाड, आंबा, बकुळ, जास्वंद, सीताफळ आदी झाडे ही आपल्यासाठी जीवनदायी वृक्ष आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com