
कोरेगाव : येथील आगाराची वाठार स्टेशन- भाडळेमार्गे- कोरेगाव बस बुधवारी दुपारी हासेवाडी (ता. कोरेगाव) येथे प्रवासी चढ- उतार करताना अचानक बसने पेट घेतला. यामध्ये केबिनसह काही सीट जळून खाक झाल्या. सुदैवाने प्रवासी, चालक व वाहक सुखरूप आहेत. घटनेची नोंद वाठार पोलिसांत झाली असून, सुमारे सव्वालाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.