Koregaon Society Election 2026 : कोरेगाव मतदारसंघात पुन्हा ईश्वर चिठ्ठीचा योगायोग; पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! 2021 मध्ये खत्री चिठ्ठीवर विजयी, तर 2026 मध्ये मानेंना नशिबाची साथ

Koregaon bank election result 2026 : कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघात सुनील माने आणि सुनील खत्री यांना प्रत्येकी ४४ मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीद्वारे सुनील माने विजयी झाले. २०२१ मधील निकालाची पाच वर्षांनंतर पुनरावृत्ती झाली.
Koregaon Society Constituency Election 2026

Koregaon Society Constituency Election 2026

esakal

Updated on: 

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघात पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा अनोखा योगायोग पाहायला (Sunil Mane wins Koregaon society constituency) मिळाला. २०२१ च्या निवडणुकीप्रमाणेच २०२६ च्या निवडणुकीतही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निकालाचा फैसला ईश्वर चिठ्ठीद्वारे करावा लागला. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीने भाजप समर्थक सुनील खत्री यांना साथ दिली होती, तर यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने यांच्या बाजूने कौल लागला. त्यामुळे कोरेगावच्या राजकीय वर्तुळात या योगायोगाची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...