
-पांडुरंग बर्गे
कोरेगाव : शहरातून जाणाऱ्या सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे, जरंडेश्वर शुगर मिलची दिवसेंदिवस वाढत असलेली ऊस वाहतूक, महामार्ग झाल्याने वाढलेली अवजड वाहतूक, दैनंदिन एसटी व खासगी प्रवासी वाहतूक, पादचारी यामुळे शहराला रात्रीचे अवघे काही तास वगळता दिवसभर वाहतूक कोंडीने विळखा घातलेला दिसतो. त्यामुळे अपघातात वाढ झाली असून, चार दिवसांपूर्वी एक १२ वर्षांची युवती ठार झाली, तर काल रात्री एका व्यक्तीवर आपला पाय गमविण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या रखडलेल्या कामांच्या पूर्ततेसाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाला अजून किती बळी हवेत? असा प्रश्न विचारला जात आहे.