
Police action against 673 in Koregaon during Ganeshotsav; strict security measures by DySP.
कोरेगाव : गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथे नव्याने रुजू झालेले पोलिस उपअधीक्षक अजित टीके यांनी कोरेगाव उपविभागातील ६७३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेशोत्सव आणि आगामी काळातील विविध सण विचारात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सातारा ग्रामीण उपविभागाद्वारे हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे.