
कोरेगाव : तालुक्यातील जरंडेश्वरसह शिवनेरी साखर कारखान्याचे वजनकाटे अचूक असल्याचा निर्वाळा महसूल विभागाच्या तपासणी पथकाने दिला आहे. शेतकरी संघटनांकडून सातत्याने सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल व जयपूर येथील शिवनेरी या दोन खासगी साखर कारखान्यांचे वजनकाटे महसूल विभागाच्या वतीने अचानकपणे तपासण्यात आले. यावेळी महसूल, वैधमापन विभागाचे अधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.