esakal | सरसकट वेतनासाठी कोतवाल संघटनेचं सहकारमंत्र्यांना साकडं
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

कोतवालांना चतुर्थ श्रेणी (Class IV) लागू करण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सरसकट 15 हजार वेतन देण्यात यावे.

सरसकट वेतनासाठी कोतवाल संघटनेचं सहकारमंत्र्यांना साकडं

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोतवालांना चतुर्थ श्रेणी (Class IV) लागू करण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सरसकट १५ हजार वेतन देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सातारा जिल्हा कोतवाल संघटनेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांना निवेदन देवून साकडे घातले. कोतवाल संघटनेचे (Kotwal Association) सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश काशिद, विशाल भोसले, सुदर्शन चव्हाण, रमेश चन्ने, निवास काटकर, राजेंद्र सावंत, रमेश पाटील, केशव कुंभार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनातील माहिती अशी : कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करुन समान काम-समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट १५ हजार रुपये वेतन देण्यात यावे, नागरपूरच्या मार्गदर्शनामुळे शासन निर्णयाप्रमाणे पात्र असूनही कोतवाल यांना वेतनवाढ मिळत नाही, त्यासाठी नागपूर मार्गदर्शन रद्द करावे.

हेही वाचा: एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या : पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील

तसेच कोतवाल यांना तलाठी, महसूल सहाय्यक व तत्सम पदभरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे, शिपाई संवर्गाच्या सर्व जागा कोतवाल पदातून भराव्या, कोरोनाने मयत झालेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत समावेश करावा, सेवानिवृत्तीनंतर कोतवालांना १० लाखांचा निर्वाहभत्ता द्यावा आदी मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्री पाटील यांना आज दिले.

loading image
go to top