esakal | एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या :पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival

एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या : पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड : गणेशोत्सव काळात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडळांनी शक्यतो एक गाव एक गणपती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पोलीस (Police) उपअधिक्षक डॉ. रणजित पाटील Dr.(Ranjit Patil) यांनी केल्या.

आटके टप्पा येथे तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाची आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत बोलत होते. तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, उदय दळवी उपस्थित होते. डॉ. पाटील म्हणाले, गणेश मंडळांनी अनाठायी खर्च टाळून पुरग्रस्त गरजूंना मदत करावी. शासनाच्या अटी व नियमांचे भंग झालेस संबंधित मंडळाचे कार्यकर्ते यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी सर्व गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पाटील यांनी केले.

Ganesh Festival

Ganesh Festival

तालुक्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करताना कोणावरही सक्ती करू नये. मंडळे स्थापन करताना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊनच मंडपाचे नियोजन करावे.

हेही वाचा: सीबीआयच्या उपनिरीक्षकाला आयफोन १२ प्रो

पोलीस निरीक्षक खोबरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शासनाने गणेशोत्सव काळात मार्गदर्शक सूचना व अटी नियमांचे पालन करून साधे पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणेचा सूचना केल्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक मूर्ती ही चार फूट उंचीची व घरगुती मूर्ती ही दोन फूट उंचीचीच असावी.

वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी गणेश मंडळे उभी करू नयेत. कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता गर्दी न करता समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे. मूतीच्या सरंक्षणात कायमस्वरूपी स्वयंसेवक उपस्थित ठेवावे. तसेच गणेशोत्सव आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये व गुलालाचा वापर करू नये अशा सूचना त्यांनी केल्या.

loading image
go to top