
-सचिन शिंदे
कऱ्हाड : पुणे-बंगळूर महामार्गावरील येथील कोयना नदीवरील नवीन पुलाचे काम जपानच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने सुरू आहे. पुलाला मजबूत करणाऱ्या व रस्त्याला जोडण्याचा विस्तार जपानच्या तंत्रज्ञानाने बदलण्यात येत आहे. टोकियोमध्ये तयार झालेली अत्याधुनिक सामग्री त्यासाठी वापरली जात आहे. जपानचे तंत्रज्ञान देशात पहिल्यांदाच येथे वापरली जात आहे. त्यामुळे पुलाचे सरासरी आयुर्मान ५० वर्षांनी वाढणार आहे.