esakal | धो-धो बरसणारा पाऊस अचानक गायब; 'कोयना' प्रतीक्षेत!
sakal

बोलून बातमी शोधा

Koyna Dam

गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी कोयना, नवजा, महाबळेश्वर या तीन ठिकाणी १८ टक्के पाऊस कमी झाला आहे.

धो-धो बरसणारा पाऊस अचानक गायब; 'कोयना' प्रतीक्षेत!

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (सातारा) : जूनच्या पहिल्या आठवड्याच धडाकेबाज हजेरी लावणारा पाऊस कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रातून गायब झाला आहे. जुलै महिन्यात धो-धो बरसणारा पाऊस अचानक गायब झाल्याने मुसळधार पावसाचे (Heavy Rain) आगार असणाऱ्या कोयना पाणलोट क्षेत्रात यंदा ३७ टक्के पाऊस कमी झाला आहे. कोयना धरणात सध्या ४१.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रातून पाऊस गायब झाल्यामुळे गेल्या महिन्यात भरतीकडे प्रयाण करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याने ओहोटीकडे वाटचाल सुरू केली आहे. (Koyna Dam Also Waiting For Heavy Rain Satara Marathi News)

मुसळधार पावसाचे आगार अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात ३६ दिवसांत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला तीन हजार ३२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे एक हजार ११७, नवजाला एक हजार १२७, तर महाबळेश्वरला एक हजार १२७ अशी तीन हजार ३७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: 'Monsoon'मध्ये फिरायला जायचा प्लॅन आहे?

Heavy Rain Satara

Heavy Rain Satara

गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी कोयना, नवजा, महाबळेश्वर (Mahabaleshwar Rainfall) या तीन ठिकाणी १८ टक्के पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाला आहे. आजअखेर ३६ दिवसांत पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे २२.०२ टीएमसी पाण्याची आवक आली आहे, तर धरणातून पश्चिमेकडील वीज व पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी ९.७४ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात सध्या ४१.१९ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ३५.६१ टीएमसी पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी सहा टीएमसी पाणीसाठा धरणात जादा आहे.

Koyna Dam Also Waiting For Heavy Rain Satara Marathi News

loading image