
पाटण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोयना धरणाची ओळख आहे. मात्र, या धरणामुळे घर आणि जमीन गमावणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचा ६४ वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या धरणग्रस्तांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त (ता. १२) ला कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावर आंदोलनाचा इशारा दिला. याबाबत कोयना धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त संग्राम समितीचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी पत्रक काढले आहे. त्यावर महेश शेलार, विनायक शेलार, सचिन कदम, राम कदम व कोयना धरणग्रस्तांच्या सह्या आहेत.