
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पश्चिम भागात मुसळधार सरी बंद झाल्या. पूर्व भागात आज सूर्यदर्शनही झाले. पावसाचा जोर कमी झाल्याने जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असून, पाणीसाठा नियंत्रणात असल्यामुळे धरण व्यवस्थापनाने साडेसहा फुटांवर असणारे धरणाचे सहा वक्र दरवाजे आज अडीच फुटांनी कमी करून सायंकाळी पाचच्या सुमारास चार फुटांवर आणले. सध्या सहा वक्र दरवाजातून १९ हजार ७२४ क्युसेक, पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक असा एकूण २१ हजार ८२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.