Koyna Dam: कोयनेचे दरवाजे चार फुटांवर स्थिर; पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी कमी
जलाशयात प्रतिसेकंद २६ हजार ४२३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ४०, नवजाला ६८ आणि महाबळेश्वरला ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काल सायंकाळी पाच वाजता साडेसहा फुटांवरून चार फुटांवर आणलेले दरवाजे आज चार फुटांवर स्थिर ठेवले.
Koyna dam gates stable at 4 feet as rainfall reduces; controlled water release continues.Sakal
पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रणात असल्याने काल सायंकाळी पाच वाजता साडेसहा फुटांवरून चार फुटांवर आणलेले दरवाजे आज चार फुटांवर स्थिर ठेवले.