.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Koyana Dam Water Release
कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटावरून दोन फुटापर्यंत उघडून १४ हजार आठ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पायथा वीज गृह आणि दरवाजातुन १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणात सध्या ९७.०७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.