
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार; नवजा, महाबळेश्वरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद
कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा ,महाबळेश्वर ,वलवण या ठिकाणी चोवीस तास रेकॉर्डब्रेक पाऊसाची नोंद झाल्यामुळे ओहोटीच्या दिशेने निघालेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्ब्ल ३ टीएमसी ने वाढ होवून धरणातील पाणीसाठ्याने भरतीकडे प्रयाण केली आहे.कोयना धरणात 17.83 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.नवजा येथे सर्वाधिक 244 मीमी पाऊसाची नोंद झाली आहे.
गत चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सक्रीय झालेल्या पाऊसाचा वेग गत चोवीस तासात वाढला आहे.पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठीकाणी मुसळधार पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत.पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २१२३२ ,कुसेस्क झाली आहे.गत चोवीस तासात पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १५६ मिमी नवजा येथे २४४ मीमी तर महाबळेश्वर येथे 197 मिमी पाऊसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात यामुळे चोवीस तासात तब्बल ३ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.धरणाचा पाणीसाठा 17.83 टीएमसी झाला आहे़.पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठीकाणी पाऊसाचा जोर कायमच आहे.
Web Title: Koyna Dam Record Breaking Rainfall Recorded In Navja Mahabaleshwar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..