
-हेमंत पवार
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी पहिल्यांदाच पाणी कोयना नदीत सोडण्यात आले. आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून तीन हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.