

Koyna Jalsagar Renamed to Honour Chhatrapati Shivaji Maharaj, Statewide Reactions
Sakal
पाटण: कोयना धरणाच्या शिवाजी जलाशयाचे नामकरण होऊन ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर’ असे नामकरण झाले. यामुळे कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक नुकतेच बदलण्यात आले आहेत. या ऐतिहासिक नामकरण बदलामुळे कोयना परिसरासह राज्यातील तमाम शिवप्रेमींनी अभिमानाने आनंद व्यक्त केला. गेल्या १० वर्षापासून या नामकरणासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याची भावना भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.