

Koyna Dam Water Discharge Stopped Completely Reservoir Holds 93.02 TMC Water As Maharashtra Monsoon Situation Changes
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धऱणाच्या दरवाज्यातुन विसर्ग पुर्णपणे बंद करण्यात आला असुन धरणाच्या पायथा वीज गृहातुन फक्त सध्या 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा आहे.