Koyna Water Release: कोयना धरणातून मोठा विसर्ग! ९१ टीएमसी पाणीसाठा, कृष्णा नदीची पातळी वाढली

Koyna Dam Releases More Water After Storage Crosses 91 TMC: कोयना धरणातून ३३ हजार ८२६ क्यूसेक विसर्ग कायम; २४ तासांत ४.२३ टीएमसीने साठा वाढल्याने कृष्णा नदीची पातळी झपाट्याने उंचावली
Viral Video Koyna Dam Water Release 91 TMC Storage Heavy Rain Pushes Krishna River Water Level Higher

Viral Video Koyna Dam Water Release 91 TMC Storage Heavy Rain Pushes Krishna River Water Level Higher

esakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज जलसागरासह परिसरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधून मधून मोठ्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 91.31 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी काल मध्यरात्री बारा वाजता सहा फुटावर करण्यात आलेले दरवाजे स्थिर असून सध्या धरणातून व पायथा वीज गृहातून 33 हजार 826 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. कोयना धरणात गेल्या 24 तासात 4.23 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com