Koyna Dam: मोठी बातमी! कोयना धरणात २४ तासांत ३.६१ टीएमसी पाण्याची भर; महाबळेश्वर, कोयनानगर, नवजामध्ये पावसाची मुसळधार

Koyna Dam Storage Rises After Heavy Rain: महाबळेश्वर, कोयनानगर व नवजामधील मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ३.६१ टीएमसीने वाढ; धरणाचे दरवाजे चार फुटांवर स्थिर ठेवून २४ हजार ९०८ क्यूसेक विसर्ग
Maharashtra Rain Update Koyna Dam Gains 361 TMC Water In 24 Hours As Heavy Rain Continues In Catchment Areas

Maharashtra Rain Update Koyna Dam Gains 361 TMC Water In 24 Hours As Heavy Rain Continues In Catchment Areas

sakal

Updated on

-हेमंत पवार

कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची मुसळधार सुरूच आहे. आज मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगरला 105, नवजाला 128 तर महाबळेश्वरला 183 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात कोयना धरणातील पाणीसाठा 3.61 टीएमसीने वाढला आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावर स्थिर असून धरणातून व पायथावीज ग्रहातून सध्या 24 हजार 908 क्यू से क पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात सध्या 92.38 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com