Koyna Dam water level today
esakal
कऱ्हाड: कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी (१९ जुलै) रात्री ५७.४२ टीएमसी असलेला पाणीसाठा सोमवारी (२० जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंत ५८.८९ टीएमसीवर पोचला. अवघ्या रात्रीत सुमारे १.४२ टीएमसी पाण्याची भर पडल्याने धरणातील साठा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पुढील वाटचालीकडे जलसंपदा विभागासह कृष्णा खोऱ्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.