Koyna Crime News
esakal
पाटण (जि. सातारा) : कोयना विभागातील तळीये पश्चिम (ता. पाटण) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करून तिचा गळा आवळून खून (Koyna Crime News) केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. खून केल्यानंतर संशयिताने युवतीचा मृतदेह वाजेगाव परिसरातील कोयना धरणाच्या किनाऱ्यालगत जमिनीत पुरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.