esakal | कोयनानगर: ढोकावळे आपत्तीग्रस्तांचा तहसीलवर मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

कोयनानगर: ढोकावळे आपत्तीग्रस्तांचा तहसीलवर मोर्चा

कोयनानगर: ढोकावळे आपत्तीग्रस्तांचा तहसीलवर मोर्चा

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर : मुसळधार पावसाने ढोकावळे गावांवर आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. भूस्खलनामुळे गावाला दोन महिन्यापासून चाफेर-मिरगावच्या हायस्कुलमध्ये स्थलांतरीत केले आहे. दोन महिन्यानंतरही आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. ढोकावळे आपत्तीग्रस्तांची कुचंबणा होत असल्याने वैतागलेल्या आपत्तीग्रस्तांनी प्रशासनाच्या निषेधार्थ पाटण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा: आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर; केंद्रात जोरदार हाणामारी

कोयनानगर विभागात २२ जुलै झालेल्या मुसळधार पावसाने ढोकावळे गावांत भूस्खलन झाले. त्यामुळे गावातील पाच लोक जमीनदोस्त होवुन प्रचंड वित्तहानी झाली आहे. संपुर्ण गावाला धोका निर्माण झाल्यामुळे गावातील ग्रामस्थांना जवळच असणाऱ्या चाफेर-मिरगाव या विद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. दोन महिन्यापासून आपत्तीग्रस्त ग्रामस्थ शाळेत कोरोना काळात दाटीवाटीने राहत आहेत. स्थलांतरीत केलेल्या लोकांना शासनाने जाहिर केलेले सानुगृह अनुदान प्रशासनाने दिले नाही.

यामुळे वैतागलेल्या आपत्तीग्रस्तांनी थेट तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेवून आपली कैफियत मांडली आहे. ढोकावळे येथे झालेल्या भूसल्खना मध्ये गंभीर जखमी होवुन मयत झालेल्या वैशाली विठ्ठल वाडेकर यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, स्थलांतरीत ग्रामस्थांना प्रशासनाने मोफत रेशनिंग देण्याचे बंद केले आहे, ते पुन्हा सुरु करावे यासह अन्य मागण्या आपत्तीग्रस्तांनी यावेळी केल्या.

आपत्तीग्रस्तांनी मोर्चाव्दारे केलेल्या मागण्याची पाटण तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी तातडीने दखल घेतली. त्यानंतर त्यांनी येत्या बुधवार पर्यंत आपत्तीग्रस्तांना कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५ खोल्यात तात्पुरते स्थलांतर करण्याबरोबर सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीने मोफत रेशनिंग वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

बँकेकडुन विलंब झाल्यामुळे आपत्तीग्रस्तांना सानुगृह अनुदान खातेदारांच्या खात्यावर जमा होण्यास विलंब लागला असुन ते तातडीने जमा होतील असे सांगितले. संपत जाधव, सुरेश शेलार, सदाशिव कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

loading image
go to top