esakal | आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर; केंद्रात जोरदार हाणामारी
sakal

बोलून बातमी शोधा

Kale Health Center

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर; केंद्रात जोरदार हाणामारी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काले (सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Black Primary Health Center) शिपाई, स्वीपर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रोजच्या भांडणाला, हाणामारीला येथील ग्रामस्थ कंटाळले आहेत. शिवीगाळ, कामातील कामचुकारपणामुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे. त्यांची तातडीने बदली करावी, अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत (Gram Panchayat) व ग्रामस्थांनी दिला आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या केंद्रातील काही कर्मचारी दवाखान्याच्या पाठीमागील असलेल्या इमारतीत राहतात. आठ दिवसांपासून शिपाई, स्वीपर व कर्मचारी यांची रोजच कडाक्याची भांडणे होत आहे. तर या भांडणात अश्‍‍लील शिवीगाळही होत आहे. भांडणे इतकी जोरात आहेत की चावा घेण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. त्यांच्या कामात अनियमितताही असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

हेही वाचा: सहकारातील 1317 संस्थांच्या निवडणुकांचा वाजला बिगुल

त्यांच्या रोजच्या भांडणांना रुग्ण कंटाळले आहेत. ते राहत असलेल्या इमारतीशेजारी राहणाऱ्या लोकांनी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायतीकडे तक्रार करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी या तिघांना वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, हे कर्मचारी कोणाचेच ऐकत नाहीत. आरोग्य केंद्रातील बेशिस्त वर्तन करून तेथील वातावरण दूषित केले जात आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांना सेवा देतानाही त्यांच्याकडून योग्य पध्दतीने दिली जात नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांची बदली करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

हेही वाचा: उदयनराजेंच्या विरोधात उमेदवार कोण? राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

काले प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची भांडणे सुरू आहेत. त्याला ग्रामस्थांसह रुग्ण कंटाळले आहेत. त्यांची भांडणे रुग्णांच्या जिवावर बेतू शकतात. त्यांची तातडीने बदली करावी अन्‍यथा आरोग्य केंद्रास ग्रामस्थांच्या वतीने टाळे ठोकू.

-अलताब मुल्ला, सरपंच, काले

loading image
go to top