पुरोगामी महाराष्ट्रात असंही काही घडतंय! 'संविधान' वाचून क्रांतीबनात शिक्षकाचा प्रवेश

उंडाळेतील प्राथमिक शिक्षक सुहास पाटील हे सामाजिक कार्यात आघाडीवर असतात.
Constitution
Constitutionesakal

उंडाळे (सातारा) : जुन्या परंपरेला फाटा देत भारतीय संविधानाचे (Indian Constitution) वाचन करून पुरोगामी आणि वैज्ञानिक पध्दतीने गृहप्रवेश करत येथील प्राथमिक शिक्षक सुहास महादेव पाटील यांनी "क्रांतीबन' (Krantiban Building) या बंगल्याची वास्तुशांत अनोख्या पद्धतीने केली. त्यांच्या या वैज्ञानिक उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. (Krantiban Building Entry At Undale After Reading The Constitution Book Satara News)

येथील प्राथमिक शिक्षक सुहास पाटील हे सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन, वृक्षारोपण, वणवा विरोधी मोहीम, जटा निर्मूलन, ग्रंथ चळवळ असे समाजोपयोगी उपक्रम ते राबवतात. क्रांती ग्रुपच्या माध्यमातून युवकांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन, ग्रंथालयाचे संवर्धन, काव्यवाचन स्पर्धा, गणेशोत्सवात समाज जागृती करतात. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचेही कार्य सुरू आहे. शिवम्‌ प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच घर बांधले. त्या घराला "क्रांतीबन' हे नाव दिले.

वास्तुशांत पारंपरिक पद्धतीने न करता धार्मिक विधीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा, राज्यघटना व अन्य पुस्तकांची पूजा करण्यात आली. माती, बियाणे, वृक्षांचे पूजन करून वास्तुशांत झाली. भारतीय संविधानाचे वाचन करत गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर कुंभार, माजी प्राचार्य बी. पी मिरजकर, धनंजय पवार, सुहास प्रभावळे, महादेव पाटील, सुप्रिया पाटील, सारिका पाटील, सुनील पाटील, अवधूत पाटील, सुयश पाटील व कुटुंबिय उपस्थित होते.

पाच विद्यार्थी घेतले दत्तक

वास्तुशांतीसाठी मोठा खर्च होतो. तो अनाठायी खर्च टाळून पैसा विविध सामाजिक संस्थांना मदत म्हणून देण्याचा निर्णय सुहास पाटील यांनी घेतला. त्यानुसार दहा सामाजिक संस्थांना प्रत्येकी हजार रुपयांची मदत त्यांनी केली. त्याचबरोबर पाच विद्यार्थी दत्तक घेतले आहेत.

Krantiban Building Entry At Undale After Reading The Constitution Book Satara News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com