esakal | कोरोनाविरोधातील युद्ध एकत्रित लढ्यातून जिंकू; सभापती रामराजेंची स्पष्ट ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Speaker Ramraje Nimbalkar

कोरोनाविरोधातील युद्ध एकत्रित लढ्यातून जिंकू; सभापती रामराजेंची स्पष्ट ग्वाही

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : दुसऱ्या लाटेत कोरोना (Coronavirus) वाढत आहे. मात्र, राजकारणविरहित एकत्रित लढ्यातून हे युद्ध लवकरच जिंकू, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी व्यक्त केला. येथील चैतन्य कोविड रुग्णालय व विलगीकरण केंद्राच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. श्री ब्रह्मचैतन्य महाराज संस्थानने शासनाला दवाखाना उपलब्ध करून दिला आहे. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुढाकाराने या रुग्णालयात 30 ऑक्‍सिजन बेडच्या सुविधा सुरू करण्यात आल्या. नवचैतन्य हायस्कूलमध्येही शंभर बेडचे विलगीकरण व उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्‌घाटन आज संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (Speaker Ramraje Nimbalkar Testifies To Win The Battle Against Coronavirus)

या वेळी रामराजे निंबाळकर, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil, आमदार जयकुमार गोरे, बाळासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती. विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचीही ऑनलाइन उपस्थिती होती. चैतन्य कोविड रुग्णालय व विलगीकरण केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. आशित बावडेकर, प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ, अनिल देसाई, प्रभारी सभापती तानाजीराव कट्टे, सुनील पोळ, अभय जगताप, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, बाळासाहेब सावंत, युवराज सूर्यवंशी, संदीप मांडवे, तेजस शिंदे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे आदींची उपस्थिती होती.

श्री. निंबाळकर म्हणाले, ""कोरोनाची दुसरी लाट कधी संपेल व तिसरी कधी येईल सांगता येत नाही. मानवाने नेहमीच संकटावर मात केली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी गोंदवलेकर संस्थानला भविष्यात मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. ग्रामीण भागात विलगीकरण पाळले जात नसल्याने धोका वाढत असल्याने विलगीकरण केंद्र वाढवावीत.'' नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या, ""माणमध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेंटरचा लोकांना चांगला आधार मिळाला आहे. या आपत्ती काळात उपासमार रोखण्यासाठी सरसकट सर्वांना अन्नधान्य मिळावे, म्हणून शासन लवकरच योजना सुरू करत आहे.''

कोविड सेंटर उभारणीत खासदार रणजितसिंहांचे प्रामाणिक प्रयत्न; चंद्रकांत पाटलांकडून कौतुक

बाळासाहेब पाटील म्हणाले, ""सर्वांच्या मदतीतून सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमधून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील. लोकांच्या संरक्षणासाठी शासनाचे कायम पाठबळ राहील. भविष्यातील संकट टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करू.'' प्रभाकर देशमुख, डॉ. आशित बावडेकर यांचीही भाषण झाले. दरम्यान, माण पंचायत समितीच्या वतीने चैतन्य कोविड रुग्णालय व केअर सेंटरसाठी 20 लाख रुपयांचा धनादेश या वेळी देण्यात आला. या सेंटरसाठी योगदान देणाऱ्या संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

रुग्णांच्या मदतीसाठी धावली माहेरवाशीन; कोविड रुग्णालयाला 'लाखमोलाची' मदत

Speaker Ramraje Nimbalkar Testifies To Win The Battle Against Coronavirus

loading image